भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या समता परिषद सेवा प्रकल्पाचा स्टॉल उद्घाटन समारंभास उपस्थित राहिलो.४१ वर्षांपासून चालत असलेल्या या सेवा प्रकल्पाचे यंदाही मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले होते. या स्टॉल उद्घाटनाचा मुख्य उद्देश हा समाजात परिषदाच्या सेवा उपक्रमांची माहिती समाजापर्यंत पोहोचविणे तसेच समाजात सकारात्मक बदल घडविणे हा होता.
यावेळी उपस्थितांना समाजसेवा, शिक्षण आणि सामाजिक समतेसंबंधी उपक्रमांचा प्रचार आणि माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्या संदर्भात मार्गदर्शन केले .
या कार्यक्रमात माझ्यासह कॅबिनेट मंत्री श्री. आशिष शेलार, आमदार श्री प्रवीण दरेकर, माजी मंत्री श्री भाई गिरकर आणि भाजपाचे मुंबई महामंत्री श्री राजेश शिरवडकर हे मान्यवर उपस्थित होते.














Leave a Comment