मुंबईच्या सर्वांगीण विकासात प्रत्येक घटकाचा वाटा आहे, आणि या शहराच्या गतिमान जीवनरेषा म्हणजे आपले रिक्शा आणि टॅक्सी चालकबंधू.
आज या मेहनती चालकांशी ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा’ या मोहिमेअंतर्गत संवाद साधत त्यांच्या मुंबईबद्दलच्या संकल्पना, अपेक्षा आणि सूचना जाणून घेतल्या. त्यांच्या रोजच्या संघर्षातून आणि अनुभवातून उभा राहिलेला दृष्टिकोन हा मुंबईच्या वास्तविक समस्यांचा आणि उपायांचा आरसा आहे.
या संवादादरम्यान सर्व चालकबंधूंनी वाहतूक, पार्किंग, रस्ते दुरुस्ती, सुरक्षितता आणि सार्वजनिक सुविधा यांसंबंधी अनेक महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. या सूचनांच्या आधारे मुंबईच्या विकास आराखड्यात सुधारणा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
संवादानंतर सर्वांसोबत स्नेहभोजन करत ‘एकत्र जेवण – एकत्र समाधान’ या भावनेतून सहकार्य आणि आत्मीयतेचं बंधन आणखी दृढ केलं.
या प्रसंगी माझ्यासोबत श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष तसेच भाजपा मुंबईचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी जी, माजी नगरसेवक श्री. महेश पार्कर, रिक्शा–टॅक्सी चालक-मालक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच येणाऱ्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करून, मुंबई शहर पुन्हा प्रज्वलित करण्यासाठी आणि सुंदर, स्वच्छ, सुरक्षित मुंबईच्या निर्मितीसाठी तमाम नागरिकांचे आशीर्वाद घेतले.
मुंबईच्या विकासासाठीचा हा संवाद आणि सहप्रवास पुढेही असाच सुरू राहील.




















Leave a Comment