माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्रातील ए-वन विशाल सोसायटीच्या लगत असलेली भिंत ही रात्री कोसळली होती. यावेळी प्रत्यक्ष त्याठिकाणी जाऊन मी पाहणी केली. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पंचनामा करून सदर ठिकाणी कोसळू शकणारी उर्वरित भिंत पाडण्याचे आणि कोसळलेल्या भिंतीचा मलबा त्वरित हटविण्याचे आदेश दिले. तेथे नुकसान झालेल्या घरांची दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत व तेथील नागरिकांना सुरक्षेची हमी दिली.
#Andheri #AndheriWest #AmeetSatam

Leave a Comment