आज दिनांक 03 नोव्हेंबर 2025 रोजी कलिना विधानसभा क्षेत्रातील बूथप्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुखांचा भव्य मेळावा व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
या बैठकीत येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत कलिना विधानसभा क्षेत्रातून जास्तीत जास्त महायुतीचे नगरसेवक निवडून आणण्यासाठीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या प्रसंगी माझ्यासह भाजपा मुंबई उपाध्यक्ष श्री. अमरजीत सिंह जी, जिल्हाध्यक्ष श्री. वीरेंद्र म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत मोरे, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख व पदाधिकारी मार्गदर्शन आणि मेळावा, संयोजक श्री गणेश खणकर जी, तसेच अन्य मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच, येणाऱ्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करून, मुंबई शहर पुन्हा प्रज्वलित करण्यासाठी आणि सुंदर, स्वच्छ, सुरक्षित मुंबईच्या निर्मितीसाठी तमाम नागरिकांचे आशीर्वाद घेतले.











Leave a Comment