


‘मोदी सरकारची ११ वर्षे – संकल्प ते सिद्धी’ या अभियानाच्या पार्श्वभूमीवर काल, १७ जून रोजी दादर येथील वसंत स्मृती येथे एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. देशाचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने केलेल्या ऐतिहासिक कार्यांचा आढावा घेत, या उपक्रमाची रूपरेषा अधिक व्यापक करण्यात आली.
या ११ वर्षांत भाजपा सरकारच्या विविध योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचत देशहितासाठी ठोस पावले उचलण्यात आली आहेत. आता हे यश घराघरात पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे.
भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष मा. श्री. रवींद्र चव्हाण जी यांच्या मार्गदर्शनाखाली नवनियुक्त जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी व वॉर्ड अध्यक्षांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच, मुंबईतील सर्व नव्या जिल्हाध्यक्षांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच, संघटनात्म्क बाबींवर देखील त्यांनी मार्गदर्शन केले.
या बैठकीस भाजपा मुंबई अध्यक्ष मा. श्री. आशिष शेलार जी, प्रदेश सरचिटणीस आ. श्री. विक्रांत पाटील जी, प्रदेश महामंत्री श्रीमती माधवीताई नाईक आणि मुंबई पदाधिकारी उपस्थित होते.







Leave a Comment