आज आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनासमवेत दादर येथील भाजपा मुंबईच्या कार्यालयात महत्वपूर्ण बैठक घेतली.
यावेळी आगामी महानगरपालिकाबाबत आखण्यात येणाऱ्या रणनिती संदर्भात उपस्थित पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी सर्वांनी एकमताने महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवण्याचा निर्धार केला.
यावेळी कॅबिनेट मंत्री तसेच निवडणूक प्रभारी मा. श्री. आशिष शेलार जी, विधानपरिषद गटनेते मा.श्री. प्रविण दरेकर जी, राज्यसभा खासदार मा श्री मिलिंद देवरा जी, माजी खासदार श्री राहुल शेवाळे जी,आ. श्री अतुल भातखळकर जी, आ. श्री प्रकाश सुर्वे, आ. श्री योगेश कदम, शिवसेना प्रवक्त्या सौ शीतलताई म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.










Leave a Comment