

भगवान श्री सिद्धिविनायकाच्या पवित्र चरणी नतमस्तक होऊन नवनियुक्त मुंबई भाजपा अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर आशीर्वाद घेतला. मुंबईचे जनजीवन अधिक सुखकर व्हावे, शहराच्या विकासाला गती मिळावी आणि महायुतीचा भगवा झेंडा भक्कमपणे फडकत राहावा, यासाठी बाप्पाकडे प्रार्थना केली.
ही जबाबदारी माझ्यासाठी सेवाभाव, प्रामाणिकता आणि अथक परिश्रम यांचा संकल्प आहे.
मुंबईकरांचा विश्वासच माझी खरी ताकद आहे आणि त्याच विश्वासाच्या जोरावर विकासाचा हा प्रवास अधिक वेगाने पुढे नेऊ, असा दृढ निर्धार आज घेतला.







Leave a Comment