३ जानेवारी २०२६ रोजी वरळीतील NSCI DOME मैदानावर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ सोहळा आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे जी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले जी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनात यशस्वीपणे पार पडला.
या प्रचार शुभारंभ सोहळ्यास भाजपा मुंबईचे सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच शिवसेना व रिपाइचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते .
महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीची गरज अधोरेखित करणारा हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि एकजुटीचा ठरला ज्याने इथे असलेल्या प्रत्येक मनात विजयाची ज्योत प्रज्वलित केली.
यावेळी उपस्थित सर्वांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचा अंत करून महापालिकेवर भाजपा शिवसेना व रिपाई महायुतीचा भगवा ध्वज फडकवण्याचा एकमताने निर्धार केला.


















Leave a Comment