






संस्कृतीचा सन्मान आणि स्त्री शक्तीचा जागर!
📍प्रभाग क्र. ६६, अंधेरी पश्चिम विधानसभा
अंधेरी पश्चिम येथील प्रभाग क्र. ६६ येथे माझ्या नेतृत्वाखाली महिलांसाठी भव्य हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला माझी पत्नी सौ. श्वेता साटम, माजी नगरसेविका श्रीमती सुद्धा सिंह जी तसेच सुमारे २००० महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला तसेच पारंपरिक पद्धतीने एकेमकांना हळदी कुंकू लावून शुभेच्छा दिल्या.
माता-भगिनींना दैनंदिन धावपळीतून मोकळा श्वास घेता यावा, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा आणि संस्कृतीचे मूल्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. अशा कार्यक्रमांमुळे महिला सबलीकरणाला हातभार लागतो आणि समाजात सामंजस्य निर्माण होते.
Leave a Comment