आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत एक्सप्रेस (हिंदी माध्यम) कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान मुंबईचा सर्वांगीण विकास, सामान्य नागरिकांच्या विविध अपेक्षा तसेच शहराच्या भविष्यातील दिशा यावर सखोल चर्चा झाली.
तसेच मुंबईच्या पायाभूत सुविधा सुधारणा, रहिवाशांच्या दैनंदिन समस्या सोडवणे, पर्यावरण संरक्षण, शिक्षण व आरोग्य सुविधांचा विस्तार आणि आर्थिक प्रगतीसाठीच्या योजनांसारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर विचारमंथन करण्यात आले. या चर्चेतून निवडणुकीपूर्वी नागरिकांच्या हितांना प्राधान्य देण्याची आवश्यकता अधोरेखित झाली. तसेच मुंबईच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्धतेचा पुनरुच्चार करण्यात आला.
यावेळी माझ्यासोबत भाजपा मुंबई सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी जी देखील उपस्थित होते.











Leave a Comment