आज धारावी येथील Art of Living Center मध्ये भव्य, दिव्य आणि संगीतमय सत्संगाचा आनंद लुटण्याचे भाग्य लाभले.
यावेळी वातावरणात सर्वत्र मंत्रांची शक्ती, भजनांचे माधुर्य आणि ध्यानाची शांतता पसरली होती. प्रत्येक स्वर, प्रत्येक लय अंतर्मनाला स्पर्श करून आत्मा अधिक शुद्ध, शांत आणि समाधानी करत होती.
आजचा हा सत्संग सोहळा म्हणजे शरीरात वाहणाऱ्या चैतन्यमय लहरींशी हळुवार संवाद साधणारा स्पंदन होता. ईश्वराशी जोडलेली एक गूढ दिव्य अनुभवाची अनुभूती होती.
याक्षणी मन, शब्द आणि कर्म शुद्ध ठेवण्यासाठी प्राणायाम, ध्यान आणि कृतज्ञता हीच खरी साधना असल्याची पुन्हा जाणीव झाली
यावेळी माझ्यासह भाजपा मुंबईचे महामंत्री श्री राजेश शिरवडकर जी, जिल्हाध्यक्ष श्री नीरज उभारे, श्री मनी बालन, श्री रवी राजा इत्यादी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते आणि असंख्य भक्तगण उपस्थित होते.













Leave a Comment