युवक मंडळाच्या वतीने प्रगत गुरुहरी पूज्य प्रबोध स्वामी महाराज यांच्या दिव्य उपस्थितीत धर्मवीर संभाजीराजे मैदान, सांताक्रुझ (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आलेल्या “आनंद पर्व अध्यात्मिक उत्सवा” तील दिव्य सभेस माजी नगरसेवक श्री अनिष मकवानी यांच्यासह उपस्थित राहिलो.
या उत्सवात प्रबोध स्वामी महाराजांनी आधुनिक जीवनशैली, मूल्यनिष्ठ आचरण, अध्यात्मिक साधना आणि समताधिष्ठित समाजनिर्मिती या विषयांवर मार्गदर्शन केले. त्यांचे विचारामृत ग्रहण करताना वैयक्तिक जीवन, कुटुंबव्यवस्था व सामाजिक बांधिलकी यांकडे अधिक सजगतेने पाहण्याची प्रेरणा मिळाली.
पूज्य भक्तिप्रिया स्वामी, पूज्य हरिप्रिया स्वामी, पूज्यभाई सुरेशभाई राठोड, पूज्यभाई प्रशांतभाई पटेल आणि पूज्यभाई जिग्नेशभाई शाह यांनी अत्यंत स्नेहपूर्ण आग्रहाने या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले.
त्यांच्या विनम्र आमंत्रणास मान देत या पवित्र आणि संस्मरणीय उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळाली, हे माझ्यासाठी गौरवाचे व समाधानाचे कारण आहे.












Leave a Comment