आरती देव व अजिंक्य देव यांच्या समाजातील विशेष मुलांसाठी चालवत असलेल्या अकॅडमी ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंट संस्थेला मी भेट दिली.
या भेटीदरम्यान संस्थेच्या उत्कृष्ट कार्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. विशेष गरजा असलेल्या या मुलांसाठी शिक्षण, विकासात्मक उपक्रम आणि थेरपी सेवांद्वारे या संस्थेने उल्लेखनीय काम केले आहे. या संस्थेचे संस्थापक आरती देव व अजिंक्य देव यांच्या समर्पणाने या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे सामर्थ्य प्राप्त होत आहे.
विशेष मुलांसाठी असे समर्पित कार्य खरोखर प्रेरणादायी आहे. या महत्वपूर्ण भेटीतून या विशेष मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ठोस पावले उचलण्याचा मी संकल्प केला.

















Leave a Comment