कुणबी समाजाच्या विविध मागण्या, प्रलंबित प्रश्न आणि आगामी उपक्रमांवर सविस्तर संवाद साधण्यासाठी मुंबई येथील कुणबी समाजोन्नती संघ आणि कुणबी ज्ञाती गृह,परळ येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहिलो.
या बैठकीत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचवणे, शैक्षणिक संधी वाढवणे, समाजाच्या ओळखीचा सन्मान जपणे आणि आगामी पिढ्यांसाठी मजबूत पायाभूत व्यवस्था निर्माण करणे याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
समाजहिताच्या कार्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी माझ्यासह संघ अध्यक्ष अनिल नवगणे जी, उपाध्यक्ष उदय कटे जी, शंकर म्हसकर, अवधूत तोरस्कार, बबन उंडरे, सरचिटणीस कृष्ण बने, महेश शिर्के, रवींद्र कुरतडकर, प्रमोद खेराडे, संजय उमासरे तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष श्री नीरज उभारे, भाजपा मुंबई सचिव श्री प्रतीक करपे जी, माजी नगरसेवक महादेव शिवगण जी, तसेच कुणबी समाजातील मान्यवर आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.











Leave a Comment