आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख व भाजपा पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित राहिलो.
या मेळाव्यात उपस्थित सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यासाठी एकजुटीने लढा देण्याचे आवाहन करण्यात आले.
या बैठकीला माझ्यासह मुंबई भाजपा महामंत्री श्री. गणेश खणकर जी, जिल्हाध्यक्ष श्री. ज्ञानमूर्ती शर्मा जी, माजी नगरसेविका श्रीमती प्रीती सातम जी, मुंबई भाजपा उपाध्यक्ष श्री. प्रवीण मरगज जी, जिल्हा संयोजक श्री. संतोष मेढेकर जी, जिल्हा महामंत्री श्रीमती पूजा मेढेकर जी, जिल्हा उपाध्यक्ष श्री. संदीप दुबे जी, तसेच इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
जोगेश्वरी पूर्व विधानसभा संघटनेची ताकद आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता, आगामी निवडणुकीत महायुतीचा भक्कम विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि विकासाभिमुख मुंबईसाठी सर्वांनी एकजुटीने भाजपाचा आवाज अधिक बुलंद करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.














Leave a Comment