शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई पश्चिम विभाग, मुख्य निमंत्रक, सहनिमंत्रक व मुख्याध्यापक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आयोजित “पी. पश्चिम विभाग विज्ञान प्रदर्शन २०२५–२०२६” चा उद्घाटन सोहळा माझ्या शुभहस्ते संपन्न झाला.
वर्सोवा वेल्फेअर असोसिएशन हायस्कूल, हरमिंदर सिंग रोड, आराम नगर, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम) येथे दिनांक १६, १७ व १८ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित हे विज्ञान प्रदर्शन “विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी STEM” या संकल्पनेवर आधारित आहे.
विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना, प्रायोगिक प्रकल्प व विज्ञान- तंत्रज्ञानावरील सर्जनशील मांडणी अत्यंत प्रेरणादायी होती.
या उद्घाटन समारंभात मुख्य अतिथी शास्त्रज्ञ श्री. जयबाळ नदूवाथ, प्रमुख मार्गदर्शक श्री. माहेश माळी, प्रदर्शन प्रमुख श्री. आशिष वाशी, वर्सोवा वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अरुण जी देव, व्यवस्थापकीय ट्रस्टी श्री. राजन चांदोक, सौ. ममता थोरात, ट्रस्टी श्री. अनिल सिंग जी, डॉ. क्षितीज मेहता, सौ. कुमुद चावरे, श्री. रवींद्र मिश्रा, श्री. राकेश सिंग, मुख्याध्यापक श्री. उठेशोर आठवले, के/प पश्चिम विभागाच्या उपनिरीक्षक श्रीमती निशा वैद,श्री. सैफी लईक आदी मान्यवर, पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















Leave a Comment