



‘वक्फ सुधार जनजागरण अभियान’
केंद्रिय अल्पसंख्यक कार्य मंत्री मा. श्री किरण रिजीजू जी व वक्फच्या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष खा. श्री जगदंबिका पाल जी यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा अल्पसंख्यांक विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या ‘वक्फ सुधारणा जनजागरण अभियान’ या कार्यशाळेत सहभागी झालो. .
वक्फ सुधारणा विधेयक बाबत विरोधक समाजात गैरसमज पसरवून राजकीय फायद्यासाठी गोंधळाची स्थिती निर्माण करू पाहत आहेत. याला चोख उत्तर दिले जावे आणि समाजातील गैरसमज दूर व्हावे या उद्द्येशाने हे जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. याबाबत केंद्रिय मंत्री मा. श्री किरण रिजिजू जी यांनी उपस्थितांना संबोधित करून मार्गदर्शन केले.
यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री मा. श्री चंद्रशेखर बावनकुळे जी, मुंबई भाजपा अध्यक्ष आणि माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री मा. श्री ॲड. आशिष शेलार जी, खासदार मा. श्रीमती डॉ. मेधा कुलकर्णी जी, महाराष्ट्र भाजपा अल्पसंख्यक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री इद्रिस भाई मुलतानी जी, मुंबई भाजपा अल्पसंख्यक मोर्चाचे अध्यक्ष मा. श्री वसीम खान जी, भाजपचे आमदार तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Comment