








दादर येथील योगी सभागृहात महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष मा. रविंद्र चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा मुंबईची एक अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत पक्षाची आगामी दिशा, संघटनात्मक बळकटीकरण, तसेच मोदी सरकारच्या यशस्वी ११ वर्षांच्या कार्यकाळावर सविस्तर चर्चा झाली. चव्हाण साहेबांनी आपल्या मार्गदर्शनातून उपस्थित कार्यकर्त्यांना भविष्यासाठी दिशा दिली.
या कार्यशाळेला मार्गदर्शन करताना गेल्या ११ वर्षामध्ये मोदी सरकार तसेच महाराष्ट्रामध्ये आदरणीय श्री. देवेंद्र फडणवीस जी यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामांची मांडणी केली व येणाऱ्या काळामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये तशाच प्रकारचा कारभार आणण्याचा व भारतीय जनता पार्टीचा भगवा झेंडा मुंबईच्या महानगरपालिकेवर फडकवण्याचा संकल्प केला.
यावेळी भाजपा मुंबईचे अध्यक्ष मा. श्री. आशिष शेलार जी, मा. मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा जी, मुंबईतील आमदार, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष, मंडल अध्यक्ष आणि विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकत्र येऊन पक्षाच्या भविष्यासाठी ठोस रणनीती आखण्याचा हा उपक्रम अत्यंत फलदायी ठरला.







Leave a Comment