मराठी माणूस जागा झालाय, भाजपामध्ये प्रवेश करतोय…
आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या दूरदृष्टीपूर्ण व्हिजनमुळे तसेच मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या विकासाभिमुख नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली मुंबई शहराचा जो चौफेर आणि सर्वांगीण विकास होत आहे, त्या क्रांतिकारक बदलांमुळे व आमूलाग्र परिवर्तनामुळे प्रभावित होऊन उबाठा गटाच्या वॉर्ड क्रमांक १च्या माजी नगरसेविका श्रीमती तेजस्वी अभिषेक घोसाळकर जी यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आज भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला.
मुंबई शहराचा विकास, मुंबईची सुरक्षा आणि त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेवर हिंदुत्वाचा भगवा झेंडा फडकविण्याचा मुंबईकरांचा मानस श्रीमती तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांच्या भाजपा प्रवेशाने अधोरेखित झाला आहे. या सोहळ्यास उपस्थित राहून या नव्या सभासदांना भाजपासोबतच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजपाची उद्दिष्टे स्पष्ट करून पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.
यावेळी विधान परिषद गटनेते मा. आ. श्री प्रविण दरेकर जी, भाजपा मुंबई महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी जी, भाजपा मुंबई महामंत्री श्री राजेश शिरवडकर जी, भाजपा मुंबई महामंत्री श्री गणेश खणकर जी, भाजपा उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष श्री दीपक तावडे जी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











Leave a Comment