शक्ती अंगी येते आई तुझे नाव घेता,
चैतन्य अंगी येते तुझे रूप पाहता,
संकटे सगळे मिटून जातात तुझे स्मरण होता..
आपल्या आदर्श नवरात्री उत्सवास भारतीय जनता पार्टीचे नेते व माझे मार्गदर्शक आदरणीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांनी काल आवर्जून भेट दिली. यावेळी मी त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. त्यांनी देवीची मनोभावे पूजा केली. या प्रसंगी माझ्या दहा वर्षांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन हे माझे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित देवीभक्त आणि गरबा रसिकांशी संवाद साधताना मी आतापर्यंत केलेल्या कार्याविषयी त्यांनी माझी पाठ थोपटत कौतुक केले. वेळात वेळ कडून आदर्श नवरात्री उत्सवात उपस्थिती दर्शवल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त केले.
#adarshnavaratriutsav2024 #navratri2024 #navratri #NavratriBlessings #Blessings #CelebrateAndheri #andheriwest #ameetsatam






Leave a Comment