“समर्पण, सेवा आणि स्वास्थ्य पर्रीकरांच्या स्मृतीतून साकारलेला एक स्तुत्य उपक्रम!”
माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या स्मरणार्थ शहाजी राजे मार्ग विलेपार्ले पूर्व येथे उभारलेल्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व आयुर्वेदिक दवाखान्याच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहिलो.
आमदार श्री पराग अळवणी यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक श्री अभिजीत सामंत यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विशेष निधीतून हे अत्याधुनिक सुविधा आणि सामग्रीने सज्ज पाच मजली आरोग्य केंद्र उभारले.
एक लोकप्रतिनिधी आणि एक नगरसेवक कसा असावा याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे अभिजीत सामंत आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा लोकप्रतिनिधी किंवा नगरसेवक कशा प्रकारचे काम करू शकतो याचं हे उद्भूत उदाहरण या इमारतीतून आपल्याला दिसून येते.
या आरोग्य केंद्राच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर आरोग्य केंद्र, तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर डायलिसिस केंद्र तर पाचवा मजला हा योग, एकयुप्रेशर, मनोबल पोषक केंद्र सुरू करण्यात आले असून या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.
हे केंद्र नागरिकांच्या प्राथमिक आरोग्य सेवा आणि आयुर्वेदिक उपचार पुरवणार असून नागरिकांच्या आरोग्यासंबंधित समस्या सोडवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत विलेपार्ले परिसरात आरोग्य शाखेचा नवा अध्याय सुरू करणार हे निश्चित आहे.
स्व. मनोहर पर्रीकर जी यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या या आरोग्य केंद्राच्या या लोकार्पण सोहळ्यास आमदार श्री परागजी अळवणी, श्री अभिजीत सामंत, पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.















Leave a Comment