



मराठी भाषा दिनानिमित्त मी आयोजित केलेल्या ‘मधुरव’ या नाट्य प्रयोगास रसिकांचा उदंड प्रतिसाद
मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे मी आयोजित केलेल्या ‘मधुरव – बोरू ते ब्लॉक’ हा, आपली मायमराठी कशी जन्माला आली, वाढली, अस्तित्वासाठी लढली आणि समृद्ध झाली हे सांगणारा, दोन तास निखळ मनोरंजनातून प्रबोधन करणारा अभिनव तजेलदार नाट्यानुभवास रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. मधुरव हे डॉ. समीरा गुजर-जोशी लिखित व प्रसिद्ध अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटम निर्मित आणि दिग्दर्शित नाटक असून यात आकांक्षा गाडे, आशिष गाडे, आणि मधुरा वेलणकर-साटम या कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय सादर करून मराठी रसिकांची मने जिंकली.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभास महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री व मुंबई भाजपा अध्यक्ष मा. श्री आशिष शेलार जी, राज्याचे कौशल्य विकास मंत्री मा. श्री मंगल प्रभात लोढा जी, सुप्रसिद्ध सिने अभिनेते मा. श्री मनोज जोशी जी आवर्जून उपस्थित होते.
मा. श्री प्रदीप वेलणकर व दिग्गज क्रिकेटपटू श्री सचिन तेंडुलकर यांचे कुटुंबीय या कार्यक्रमास उपस्थित होते. आपल्या भाषा आणि भावविश्वाला समृद्ध आणि श्रीमंत करणारा हा नाट्यानुभव माय-बाप रसिक प्रेक्षकांना अतिशय भावला व उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांनी या अभिजात माय-मराठीच्या या प्रवासाचा सुंदर नाट्याविष्काराचा आस्वाद घेतला.
Leave a Comment