



लोकशाहीवरील काळा डाग – १९७५ ची आणीबाणी!
माजी केंद्रीय मंत्री, खासदार श्री. रविशंकर प्रसाद जी यांच्या प्रमुख उपस्थितीत सावरकर सभागृहात आयोजित “१९७५ ची आणीबाणी : लोकशाहीची हत्या!” या विशेष कार्यक्रमात सहभाग घेतला आणि उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.
२५ जून १९७५ – भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस. तत्कालीन काँग्रेस सरकारने सत्तेच्या लालसेपोटी संविधानाच्या मूल्यांची पायमल्ली केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मूलभूत हक्क, न्यायव्यवस्था यांच्यावर गदा आणत लोकशाही गळचाप केली. या काळातील भीषण वास्तवाला उजाळा देणारा आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी सजग राहण्याचा निर्धार करणारा हा कार्यक्रम होता. सदर कार्यक्रमात आणीबाणीच्या काळात संघर्ष केलेल्या सर्व लोकतंत्र सेनानींचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी भाजपा मुंबई अध्यक्ष मा. श्री. आशिष शेलार जी, माजी आमदार श्री. भाई गिरकर जी, आमदार श्री. पराग अळवणी जी, भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.







Leave a Comment