

आज वसंत स्मृती, भाजपा मुंबई कार्यालयात उत्तर पश्चिम मुंबई जिल्ह्याच्या कोअर कमिटीची महत्वपूर्ण बैठक भाजपा मुंबईचे अध्यक्ष मा. श्री. आशिष शेलार जी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
आगामी निवडणुकांचे नियोजन, संघटनात्मक मजबुती, तसेच ‘हर घर तिरंगा’ अभियान यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. येत्या काळात भाजप कार्यसंघाने राबवायच्या उपक्रमांची रूपरेषा, मतदारांशी थेट संपर्क यावरही मोलाची चर्चा झाली. या बैठकीस जिल्ह्यातील आमदार, माजी नगरसेवक, मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढील निवडणुका जिंकण्याचा निर्धार आणि जनतेच्या मनात मोदीजींच्या नेतृत्वाविषयी असलेला विश्वास घेऊन भाजप पुन्हा एकदा प्रबळ होणार आहे.







Leave a Comment