आज भारतीय जनता पार्टी, मुंबई महिला मोर्चातर्फे सौ. रितू तावडे यांच्या नेतृत्वात दादर (पूर्व) येथील भाजपा मुंबई कार्यालयात आयोजित “चला मुंबईत परिवर्तन घडवूया” संकल्प सभेला उपस्थित राहिलो.
या सभेत महिला मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या तसेच विविध विभागातील जबाबदार महिला कार्यकर्त्यांची उत्साहपूर्ण उपस्थिती पाहायला मिळाली. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि विकासाभिमुख मुंबई घडवण्याचा दृढ संकल्प या सभेत करण्यात आला.
सभेदरम्यान रस्ते सुधारणा, पाणीपुरवठा व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य आणि शैक्षणिक सुविधा सुदृढीकरण, महिला सुरक्षा व कायदेशीर संरक्षण, स्वयंसहाय्य गटांना वित्तीय बळ, झोपडपट्टी पुनर्वसन, स्वच्छ मुंबई उपक्रम तसेच पर्यावरण संरक्षण या विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच युवती आणि महिला कार्यकर्त्यांना मुंबईच्या नवनिर्माणात सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
यंदाच्या निवडणुकांमध्ये महिला आपले वर्चस्व कायम राखत, मुंबईच्या विकासकार्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, असे संकल्पसभेचे वातावरण स्पष्टपणे जाणवत होते.
या सभेला भाजपा मुंबईचे महामंत्री तसेच सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, भाजपा मुंबईचे महामंत्री श्री राजेश शिरवडकर, सौ. श्वेता परुळकर, महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्ष श्रीमती प्राचार्य वर्षाताई भोसले, माजी नगरसेविका श्रीमती आशाताई मराठे,माजी नगरसेविका श्रीमती प्रीतीताई सातम, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा श्रीमती दीपिकाताई घाग, माजी नगरसेविका श्रीमती संध्याताई यादव, माजी नगरसेविका श्रीमती जयश्रीताई खरात, तसेच भाजपा महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.















Leave a Comment