महाराष्ट्र आता थांबणार नाही!
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे आशिर्वाद आणि जनतेच्या दृढ विश्वासामुळे उभे राहिलेले महायुती सरकारने आज आपल्या यशस्वी कार्यकाळाचे पहिले वर्ष पूर्ण केले असून मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात महायुती सरकारने विकास, सुशासन आणि जनकल्याण या प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत प्रगतीची नव नवीन शिखरे गाठली आहेत.
आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार, सरकारच्या एका वर्षातील कार्याचा आढावा आणि येणाऱ्या काळातील विकास आराखडा जनतेसमोर मांडण्यासाठी महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे जी यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली.
या प्रसंगी माझ्यासह प्रदेश सरचिटणीस, आ. श्री विक्रांत पाटील जी, प्रदेश मध्यमप्रमुख सौ माधवीताई ससाणे, नवनाथ बन जी, मुंबई भाजपा सचिव श्री प्रतीक कर्पे जी, सोशल मीडिया संयोजक श्री प्रकाश गाडे जी, प्रदेश सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण जी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.









Leave a Comment