भ्रष्टाचारमुक्त बीएमसीकरता मुंबईकर भाजपासोबत…
‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा’ या मोहिमेला मुंबईकरांनी न भूतो न भविष्यति असा अभूतपूर्व प्रतिसाद दिला असून, महानगर पालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यास प्रत्येक मुंबईकर सज्ज असल्याचे या मोहिमेद्वारे जनतेने स्पष्ट केले आहे.
भाजपा मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या या मोहिमेत सुमारे 2.65 लाखांहून अधिक मुंबईकरांनी आपल्या स्वप्नातील मुंबईबद्दल मत नोंदवले आणि मोहिमेला आपला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यापैकी 1.45 लाख मुंबईकरांनी भविष्यातील मुंबई घडवण्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली, ही बाब विशेषत्वाने अधोरेखित करण्यासारखी आहे.
गेल्या 11 वर्षांत आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात आणि आदरणीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनात भाजपाने मुंबईत मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू आणि गृहनिर्माण यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा विकास केला, ज्यामुळे मुंबईत दिसून येणारा बदल नागरिकांच्या पसंतीस उतरला. त्यामुळे, मुंबईत भाजपाचे सरकार आले तर सध्या उबाठा गटाच्या हाती असलेल्या महानगर पालिकेच्या दुर्लक्षित कारभारामुळे रस्त्यांची दुरावस्था नक्कीच सुधारली जाईल, असा मुंबईकरांचा ठाम विश्वास आहे.
मुंबईकरांना टिकाऊ रस्ते, पूर नियंत्रण, नालेसफाई, गृहनिर्माण व पुनर्वसन, कचरा संकलन, स्वच्छता व पाणी पुरवठा यासंबंधित समस्या दूर करून महानगरपालिकेच्या कारभारातून मुक्त होण्याची इच्छा आहे. मुंबईतील एकूण 53% नागरिकांनी महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारावर असमाधान व्यक्त केले आहे. या मोहिमेत 18 वर्षाखालील 2%, 18–30 वयोगटातील 25%, 30–60 वयोगटातील 65%, तर 60 वर्षावरील 8% नागरिकांनी आपले मत नोंदवले.
आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने यंदा मुंबई महानगर पालिकेवर भाजपा महायुतीचा भगवा फडकणार हा विश्वास पक्का झाला आहे. ही मोहीम यशस्वी करण्यात ज्या ज्या मुंबईकरांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आपला जो उत्स्फूर्त सहभाग नोंदवला त्या बद्दल मी आपणां सर्वांचा खूप खूप आभारी आहे.
धन्यवाद











Leave a Comment