भाजपा गोरेगाव विधानसभातर्फे वॉर्ड क्र ५० येथे ठाकरे सरकार आणि मुंबई MyBmc च्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणारी आणखी एक घणाघाती सभा माझ्या उपस्थितीत पार पडली. यावेळी माझ्यासोबत आमदार श्रीमती Vidya Thakur , नगरसेवक दीपक ठाकूर व पदाधिकारी आणि गोरेगावकरवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोरेगाव येथे लोकांची झालेली प्रचंड गर्दी ही शिवसेनेच्या हातून महापालिका जाणार असल्याचा दाखला आहे, आणि शिवसेनेच्या भ्रष्टाचाराला फुंकर मारून महापालिकेत कमळ आणायला जनता किती उत्सुक आहे याची प्रचिती आज सत्ताधाऱ्यांना मिळाली आहे.
Leave a Comment