लोहार समाजातर्फे महायुती सरकारचा सत्कार सोहळा
महायुती सरकारच्या माध्यमातून लोहार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ गठीत केल्याबद्दल सरकारचे आभार व्यक्त करण्यासाठी लोहार समाज राज्यस्तरीय समन्वय समितीच्या वतीने आज दादर येथील भाजपा कार्यालयात भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात माझा विशेष सत्कार करण्यात आला, त्याबद्दल मी भाजपा मुंबईच्या कार्यकरणी सदस्या सौ. निहारिका खोंदले जी आणि समस्त लोहार समाजाचे मनापासून आभार मानतो.
या कार्यक्रमाला कॅबिनेट मंत्री तसेच मुंबईचे सहपालकमंत्री मा. श्री मंगल प्रभात लोढाजी, भाजपा मुंबईच्या कार्यकरणी सदस्या सौ. निहारिका खोंदले जी, समितीचे अध्यक्ष श्री दिलीप लोहार, कार्याध्यक्ष श्री संजय कोळंबेकर, सचिव श्री एड. युवराज जाधव यांच्यासह राज्यभरातील लोहार समाजाचे पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते. लोहार समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी सदैव कार्य करण्याची आपल्या सरकारची आणि माझी वचनबद्धता कायम राहील.















Leave a Comment