मुंबई उच्च न्यायालयातील नामवंत कायदेतज्ज्ञ अॅड. उजाला यादव यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला असून, त्यांच्या या प्रवेशामुळे भाजपच्या कायदेशीर तसेच सामाजिक आघाडीला मोठी बळकटी मिळाली आहे. कायदा, न्याय आणि सामाजिक बांधिलकीच्या क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव सर्वसामान्य नागरिकांच्या न्यायहक्कांसाठी आणि पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी मोलाचा ठरणार आहे.
या जाहीर पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी माझ्यासह जिल्हाध्यक्षा श्रीमती शलाका साळवी, जिल्हाध्यक्ष श्री. नीरज उभारे तसेच पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











Leave a Comment