




आझाद नगर क्र. ३ परिसरात डास नियंत्रणासाठी राबवली फवारणी मोहीम
माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नागरिकांकडून सातत्याने डासांच्या प्रादुर्भावाबाबत तक्रारी प्राप्त होत असल्याने, विभागातील नागरिकांच्या आरोग्याला कोणताही धोका निर्माण होऊ नये, ह्या उद्देशाने मी नेहमीप्रमाणे सजग राहून कार्यरत आहे. माझ्या मार्गदर्शनाखाली व श्री. समीर साटम यांच्या प्रयत्नांमुळे, गेले दोन दिवस सातत्याने आझाद नगर क्र. ३ परिसरात कीटकनाशक आणि डास नियंत्रक औषधांची फवारणी तसेच धूर फवारणी करण्यात आली.
ही मोहीम केवळ तात्पुरती उपाययोजना न राहता, नागरिकांच्या आरोग्यासाठी नियमितपणे अशा प्रकारचे उपाय राबवण्याचा माझा कटाक्ष आहे. आपल्या परिसरात स्वच्छता आणि आरोग्य राखण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन.
Leave a Comment