आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर मध्य मुंबई वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपा पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित राहिलो.
या मेळाव्यात उपस्थित सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यासाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन केले.
सदर बैठकीला माझ्यासह उत्तर मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष श्री वीरेंद्र म्हात्रे जी, भाजपा मुंबई महामंत्री श्री गणेश खणकर जी, मुंबई भाजपा उपाध्यक्ष श्री सुहास आडीवरेकर जी, मुंबई भाजपा सचिव श्री महेश पारकर जी, मुंबई भाजपा सचिव श्री गणेश पांडे जी, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा श्री राजेश दाभोळकर जी, इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि विकासाभिमुख मुंबईसाठी सर्वांनी एकजूट होऊन भाजपाची पताका अधिक बुलंद करण्याचा निर्धार केला.













Leave a Comment