आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुलाबा विधानसभा मतदारसंघाच्यावतीने आयोजित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपा पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित राहिलो.
या मेळाव्यात उपस्थित सर्व बूथ प्रमुख,शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यासाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन केले.
सदर बैठकीला माझ्यासह विधानसभा अध्यक्ष मा. श्री राहुल नार्वेकर जी, माजी आमदार श्री राज पुरोहित, दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्षा श्रीमती शलाकाताई साळवी, माजी नगरसेवक श्री मकरंद नार्वेकर, माजी नगरसेविका श्रीमती हर्षिताताई नार्वेकर, माजी नगरसेवक श्री आकाश राज पुरोहित, माजी नगरसेविका श्रीमती रिता मकवाना यांसोबत इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि विकासाभिमुख मुंबईसाठी सर्वांनी एकजूट होऊन भाजपाची पताका अधिक बुलंद करण्याचा निर्धार केला.











Leave a Comment