



|| गणपती बाप्पा मोरया||
दिनांक २५ ऑगस्ट २०२५, मुंबई: कोकणातील गणेशभक्तांच्या सुखद, सुरक्षित आणि वेळेत गावी पोहोचण्यासाठी भाजपा मुंबई कोकण विकास आघाडी तर्फे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून सावंतवाडी येथे कोकण गणपती स्पेशल ट्रेन सोडण्यात आली.
२५ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११.३० वाजता, मुंबई येथून या विशेष गाडीचा प्रस्थान सोहळा पार पडला.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी, महसूलमंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे जी, विधानसभेचे अध्यक्ष मा. श्री. राहुल नार्वेकर जी तसेच भाजपाचे इतर आमदार उपस्थित होते.
या विशेष ट्रेनच्या माध्यमातून हजारो कोकणवासी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपल्या गावी पोहोचणार असून, भाजपा मुंबई कोकण विकास आघाडीचा हा उपक्रम जनसेवेचं उत्तम उदाहरण ठरत आहे.







Leave a Comment