



आज माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भवंस कॉलेज, अंधेरी येथे पार पडलेल्या दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहण्याचा योग आला.
युवा शक्तीचा जोश, पारंपरिक ढोल–ताशांचा गजर, आणि गोविंदांच्या थरारक मानवी मनोऱ्यांनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता.
गोविंदा रे गोपाळा.. अशा गजरात साजरा झालेला हा उत्सव म्हणजे केवळ परंपरेचा गौरव नाही, तर एकतेचा आणि सामूहिक ऊर्जा दाखवणारा अद्भुत अनुभव होता.
या उत्सवाचे सुंदर आयोजन करणाऱ्या भवंस कॉलेजच्या सर्व टीमचं, स्थानिक कार्यकर्त्यांचं आणि गोविंदा पथकांचं मनःपूर्वक अभिनंदन!
जय गोविंदा! जय महाराष्ट्र!







Leave a Comment