भारतीय जनता पार्टी दक्षिण मुंबई, वरळी विधानसभा मतदारसंघातील बूथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख आणि विविध पदाधिकारी यांचा मेळावा व बैठक मोठ्या उत्साहात पार पडली.
या बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बूथशक्ती मजबूत करणं, संघटन अधिक बळकट करणं आणि स्थानिक स्तरावर पक्षाचं प्रभावी जाळे निर्माण करण्यासाठी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या बैठकीला माझ्यासह दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्षा श्रीमती शलाका साळवी ताई, भाजपा नेते श्री किरण शेलार, वरळी विधानसभा संयोजक श्री दीपक सावंत, युवा मोर्चा दक्षिण मुंबई अध्यक्ष श्री अर्जुन मेघे, माजी युवा मोर्चा अध्यक्ष श्री मदन गुप्ता, मंडळ अध्यक्ष श्रीमती आरती पुगावकर, श्री शैलेंद्र सिंह, श्री स्वप्नील जगदाळे तसेच अन्य मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीत कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उत्साहात सहभाग नोंदवत आगामी निवडणुकांसाठी ते सज्ज असल्याची जणू ग्वाहीच दिली.












Leave a Comment