आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र. ६० आणि ६३ येथे आयोजित बैठकीत उपस्थित राहिलो.
या बैठकीत संघटनात्मक मजबुती, स्थानिक प्रश्नांचे समाधान आणि निवडणुकीसाठी प्रभावी रणनीती- या तिन्ही स्तरांवर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच कार्यकर्त्यांचे मनोबल दृढ करणे, बूथ पातळीवरील संघटन रचना अधिक सक्षम करणे आणि प्रत्येक नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला.
यावेळी माझ्यासह माजी आमदार श्रीमती भारती लव्हेकर जी, उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष श्री ज्ञानमूर्ती शर्मा जी, अंदमान-निकोबार प्रभारी श्री रघुनाथ कुलकर्णी जी तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.










Leave a Comment