








काल दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी दादरच्या योगी सभागृहात राज्यभरातून आलेल्या ३६ लाखांहून अधिक राख्यांचा ‘राखी प्रदान सोहळा’ पार पडला. या प्रत्येक राखीमागे भगिनींचं प्रेम, त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रगतीसाठीचा विश्वास दडलेला होता.
हा सोहळा पाहताना जाणवलं – भगिनींनी दिलेला हा विश्वासाचं व्रत आपण अधिक जोमाने निभावलं पाहिजे. ‘वचन प्रगतीचे, सुरक्षेचे आणि सन्मानाचे’ – हा धागा आपल्याला सतत स्मरण करून देणारा आहे की भगिनींचं सुख, सन्मान आणि सुरक्षा हीच खरी आपली जबाबदारी आहे.
या सोहळ्यास महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, भाजपा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रदादा चव्हाण, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा श्रीमती चित्राताई वाघ, सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच भाजपा मुंबई अध्यक्ष मा. श्री. आशिष शेलारजी, राज्यमंत्री श्रीमती मेघनाताई बोर्डीकर, आ. श्री कालिदास कोळंबकर जी, आ. श्री. संजय उपाध्याय जी, आ. कॅ. तमिल सेल्वन जी, आ. श्रीमती विद्याताई ठाकूर, आ. श्रीमती मंदाताई म्हात्रे, आ. श्रीमती सुलभाताई गायकवाड, आ. श्री. प्रसाद लाड जी, प्रदेश महामंत्री आ. श्री. संजय केनेकर जी, प्रदेश महामंत्री आ. श्री. विक्रांत देशमुख जी, प्रदेश महामंत्री श्री. राजेश पांडे जी , प्रदेश महामंत्री श्रीमतीमाधवीताई नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.







Leave a Comment