वॉर्ड क्रमांक ६७ मधील भारतीय जनता पार्टी–शिवसेना–रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. दीपक कोतेकर यांच्या निवडणूक कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आज उत्साहात पार पडला.
या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ स्वयंसेवक मा. श्री. रमेशभाई मेहता यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी मंडळ अध्यक्ष श्री भवन कामतेकर तसेच वॉर्ड अध्यक्ष शंकर शिंदे, माजी नगरसेवक संजय पवार, शिवसेनेचे पदाधिकारी पराग कदम, माजी नगरसेवक सुनील गणाचार्य तसेच भारतीय जनता पार्टी, शिवसेना व आरपीआय महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक देखील उपस्थित होते.










Leave a Comment