आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी उत्तर पश्चिम मुंबई, अंधेरी पूर्व विधानसभा यांच्या वतीने आयोजित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपा पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित राहिलो.
या मेळाव्यात उपस्थित सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यासाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन केले.
सदर बैठकीला माझ्यासह अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. मुरजी पटेल जी, उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री. ज्ञानमूर्ती शर्मा जी, भाजपा मुंबईचे महामंत्री श्री. आचार्य पवन त्रिपाठी जी, तसेच श्री. सरबजीत सिंह सिंधू जी, श्री. अभिजीत सामंत जी, श्रीमती संध्या यादव ताई आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मेळाव्यातून एकच संदेश स्पष्टपणे उमटला- भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि विकासाभिमुख मुंबईसाठी सर्वांनी एकजूट होऊन भाजपाची पताका अधिक बुलंद करायची!













Leave a Comment