अंधेरी पूर्व येथे आयोजित करण्यात आलेल्या श्री बागेश्वर हनुमान चालीसा कथा कार्यक्रमास उपस्थित राहिलो. या पवित्र कार्यक्रमात श्री बागेश्वर धाम सरकार यांच्या प्रवचनाने भक्तिभाव, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जेची अनुभूती अनुभवली.
या मंगलमय वातावरणात हनुमान चालीसेचे महत्त्व आणि भगवान हनुमानाची कृपा याबाबत अत्यंत सुंदर मार्गदर्शन लाभले. अशा धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात एकात्मता वाढते आणि सांस्कृतिक मूल्ये दृढ होतात.
यावेळी रामभक्त हनुमाना चरणी नतमस्तक होत बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्याकरिता त्यांचा आशीर्वाद मागितला. या हनुमान चालीसा कथेचे रसग्रहण करण्यासाठी स्थानिक नागरिक आणि श्री राम भक्तांची अलोट गर्दी उसळली होती.













Leave a Comment