दादर पूर्व येथील वसंतस्मृती येथे भंडारी समाज एकता संघाच्या ‘नव विचार… नवी दिशा…’ या संकल्पनेतून आकारास आलेल्या भंडारी समाजाच्या भव्य मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलो. यावेळी भंडारी समाज बांधवांना मार्गदर्शन केले.
भंडारी समाजाच्या प्रलंबित मागण्या, हक्क आणि सर्वांगीण विकासासाठी एकत्र येण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत प्रशंसनीय व प्रेरणादायी ठरला.
या मेळाव्यास आमदार मा. श्री कालिदास कोळंबकर जी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच भाजपा मुंबईचे महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी जी, भाजपा मुंबईचे महामंत्री श्री गणेश खणकर जी, मुंबई सरचिटणीस श्री राजेश शिरवडकर जी, संयोजक श्री नरेंद्र गावकर जी, श्री गुरुनाथ मिठबावकर जी, श्री महेश पारकर जी, श्री तुषार कांबळी जी, श्री आशिष किर जी आदी मान्यवर आणि भंडारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















Leave a Comment