आदरणीय मा. पंतप्रधान भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या जयंतीनिमित्त “अटल सुशासन संमेलन” हे लोकाभिमुख व्यासपीठ उपलब्ध करून दिले गेले. या संमेलनास उपस्थित राहून अटलजींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
श्रद्धेय अटलजींनी जबाबदार, पारदर्शक आणि विकासाभिमुख प्रशासनाची आयुष्यभर जोपासलेली मूल्ये आजच्या कार्यकर्त्यांनी आत्मसात करण्याचा हा एक प्रयत्न आहे. २५ डिसेंबर रोजी साजरा होणाऱ्या सुशासन दिनाच्या पार्श्वभूमीवर या संमेलनात अटलजींची राष्ट्रनिष्ठा, सर्वसमावेशक विकासाची भूमिका तसेच सामान्य माणसापर्यंत योजनांचे लाभ पोहोचविण्याचा त्यांचा अटल संकल्पांचा गौरव केला जातो. त्या संकल्पांना पुढे नेण्याची नवी शपथ घेतली जाते.
या संमेलनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री मा. श्री. शिवप्रकाश जी, कॅबिनेट मंत्री मा. श्री. मंगलप्रभात लोढा जी, आमदार कालिदास कोळंबकर जी, आमदार सौ. विद्याताई ठाकूर, आमदार श्री. राजहंस सिंह, सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी जी, सरचिटणीस राजेश शिरवडकर जी, सरचिटणीस सौ. श्वेता परूळकर, यांसह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.















Leave a Comment