आज कुलाबा विधानसभा क्षेत्रातील भुलेश्वर, कबुतरखाना सर्कल येथील वॉर्ड क्र. 221 मध्ये माजी नगरसेवक श्री आकाशराज के. पुरोहित यांनी आयोजित केलेल्या आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमास विभागातील नागरिक, भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह उपस्थित राहून ऐकले.
कार्यक्रमानंतर उपस्थित नागरिकांसोबत समाजातील विविध विकासकामे व शासकीय योजनांबाबत मुक्त चर्चा केली. यावेळी जनतेने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. जनतेचा हा विश्वास आम्हाला अविरत जनसेवा करण्याचे अधिक बळ देतो.
या वेळी माझ्यासोबत माजी आमदार श्री राज पुरोहित जी, मुंबई भाजपाचे महामंत्री श्री गणेश खणकर जी, तसेच भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.















Leave a Comment