









गणेशोत्सव म्हटलं की प्रत्येक मुंबईकराच्या मनात आपल्या गावाची ओढ जागी होते. कोकणातील गावी जाऊन बाप्पाच्या स्वागताचा आनंद घेण्यासाठी अंधेरीतून निघणारा हा प्रवास खास आहे.
गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर माझ्या प्रयत्नातून आणि अंधेरी पश्चिम विधानसभा तर्फे अंधेरी पश्चिमेतून दापोली, चिपळूण, लांजा, माणगाव, वैभववाडी, सावंतवाडी, कणकवलीसारख्या कोकणातील गावांसाठी एकूण ३२ मोफत एसटी गाड्या सोडण्यात आल्या. बाप्पाच्या जयघोषात उत्साहाने गाड्यांमध्ये बसलेल्या प्रत्येक प्रवाशाच्या चेहऱ्यावर गावाची ओढ, कुटुंबाची भेट आणि गणेशोत्सवाची चाहूल दिसत होती.
हा प्रवास फक्त मुंबई ते कोकण नसून – तो भावनांचा, संस्कृतीचा आणि परंपरेचा प्रवास आहे.
तुमचं समाधान, तुमचा आनंद — हाच माझ्यासाठी बाप्पाचा खरा आशीर्वाद आहे. 🙏







Leave a Comment