Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

गोखले पुलाचा दुसरा भाग अंधेरी पश्चिम येथे भाजप मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटित

    Home Blog गोखले पुलाचा दुसरा भाग अंधेरी पश्चिम येथे भाजप मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटित
    NextPrevious

    गोखले पुलाचा दुसरा भाग अंधेरी पश्चिम येथे भाजप मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटित

    By admin | Blog | 0 comment | 11 May, 2025 | 0

    गोखले पुलाचे भाजप मंत्री आणि मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार जी यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न …
    गोखले पुलाच्या दुसऱ्या भागाचे उद्घाटन रविवारी संध्याकाळी भाजपचे सांस्कृतिक मंत्री आणि मुंबई उपनगर पालकमंत्री Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार जी यांच्या शुभहस्ते अंधेरी पश्चिम येथे पार पडले. यावेळी बोलताना सन्माननीय आशिषजींनी हा पुल म्हणजे भविष्यात मुंबईच्या गतीने होणाऱ्या विकासाची एक झलक असल्याचे सांगितले. तसेच माझ्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी प्रकल्प जलद गतीने पूर्ण होण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असे कौतुकाने उल्लेख करत ‘गोखले पुल- एक यशाची गाथा’ असे पुस्तक लिहिण्याचा त्यांनी मला सल्ला दिला.
    या कार्यक्रमात प्रास्ताविक भाषण करताना मी गोखले पुल प्रकल्पाचा इतिहास श्रीत्यांसमोर मांडला. अलिकडच्या काळात बीएमसीने सर्वात जलद गतीने पूर्ण केलेल्या प्रकल्पांपैकी एक असू गोखले पूल बंद झाल्यानंतर १५ महिन्यांच्या आत एक बाजू कार्यान्वित करण्यात आली आणि २८ महिन्यांच्या आत पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आली. हा एक असाधारण अभियांत्रिकी पराक्रम आहे. कारण एका सक्रिय रेल्वे मार्गावर बांधकामाचा समावेश होता. याउलट, ऑगस्ट २०१८ मध्ये काम सुरू झाले असले तरी, पाच वर्षांच्या विलंबानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये डिलाईल पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. म्हणूनच गोखले पुल बीएमसचा सर्वात जलद पूर्ण झालेल्या प्रकल्पांपैकी एक असल्याचे सांगितले.
    शिवसेनेचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील बीएमसीच्या अकार्यक्षम आणि अस्पष्टतेमुळे प्रकल्प लांबणीवर कसा पडला हे देखील सविस्तरपणे सांगितले. जुलै २०१८ मध्ये गोखले पुलाचा एक भाग कोसळला होता ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बीएमसीने कोसळलेल्या भागाच्या पुनर्बांधणीचा विचार सुरू केला. तथापि, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील बीएमसी प्रशासनाने २० महिन्यांचा विलंबनंतर मार्च २०२० मध्ये कामाचे आदेश जारी केले. तरीही, प्रत्यक्ष काम नोव्हेंबर २०२१ मध्येच सुरू होऊ शकले. त्यातही रेल्वे ट्रॅकवरील भाग रेल्वे किंवा बीएमसी कोण बांधणार याची स्पष्टता नव्हती.
    नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांनी प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मी प्रकल्पस्थळाला भेट दिली. त्या भेटीदरम्यान बीएमसीने नियुक्त केलेल्या सल्लागाराने स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल सादर केला. त्यात पूल अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याचे दिसून आले. स्टीलला मोठ्या प्रमाणात गंज लागला होता आणि कधीही पडू शकत होता, असे समोर आले.
    त्यानंतर मी तत्कालीन महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केला. चहल त्यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये गोखले पूल बंद करण्याचे आदेश दिले. त्यानंतर तत्कालीन मुंबई उपनगरमंत्री Mangal Prabhat Lodha , बीएमसी आणि रेल्वे यांच्यासोबत एक संयुक्त बैठक बोलावण्यात आली आणि त्यात एक व्यापक पुनर्बांधणी रणनीती आखण्यात आली. तेव्हापासून, प्रकल्पाला लक्षणीय गती मिळाली.
    जुना पूल पाडण्याचे काम जानेवारी २०२३ मध्ये सुरू झाले आणि मार्च २०२३ मध्ये नवीन पुलाचे बांधकाम सुरू झाले. प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आम्ही नियमित प्रकल्पस्थळी भेटी दिल्या आणि तत्कालीन मुख्यमंत्री मा. श्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे जी यांच्या सहभागाचा या प्रकल्पाला फायदा झाला. त्यांनी या पुलाला दोनदा भेट दिली. या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम २६ फेब्रुवारी २०२४ रोजी पुलाचा एक भाग उघडण्यात झाला – तोही बंद झाल्यानंतर फक्त १५ महिन्यांनी. त्यानंतर दुसऱ्या भागाचे काम आता यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. आज गोखले पुल पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
    गोखले पुलासारखे विक्रमी काम भविष्यात मुंबईत मोठ्या प्रमाणावर होण्याकरता मी मुंबईकरांना आशीर्वाद देण्याची आग्रही साद घातली.

    #AmeetSatam, #AmeetSatam3_0, #AndheriWest, #AshishShelar, #BJPForDevelopment, #BMCProjects, #EngineeringMarvel, #GokhaleBridge, #InfrastructureSuccess, #MumbaiInfrastructure

    admin

    More posts by admin

    Related Posts

    • अंधेरी पश्चिमच्या वॉर्ड ६७-६८ मध्ये स्थानिक नागरिकांच्या ‘तिरंगा रॅली’त मोठ्या संख्येने सहभाग

      By admin | 0 comment

      भारत माता की जय।माझ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघातील वॉर्ड क्र. ६७ व वॉर्ड क्र. ६८ या डी. एन. नगर, जुहू वर्सोवा लिंक रोड मंडळामध्ये स्थानिक नागरिकांनी ‘तिरंगा रॅली’ चे आयोजन केले होते. समाजातील सर्व स्थरातील लोकRead more

    • अंधेरी पश्चिम मतदारसंघात आयोजित भव्यतिरंगा यात्रेमध्ये सहभागी झालो

      By admin | 0 comment

      भारत माता की जय!माझ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली असून या यात्रेत सहभागी झालो. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘जय हिंद’ आदी घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. यात्रेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसादRead more

    • जुहू बीच येथे नागरिकांसमवेत तिरंगा रॅलीत सहभागी झालो

      By admin | 0 comment

      आज सकाळी जुहू बीच येथे नागरिकांसमवेत तिरंगा रॅलीत सहभागी झालो. अंतरराष्ट्रीय ख्यातीच्या जुहू बीचवर आयोजित या तिरंगा यात्रेत नागरिक प्रचंड उत्सहात मोठ्या संख्यने सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी भारतीय सैन्य आणि भारतीय सरकारची पाठराखण केली.तिरंगाRead more

    • अंधेरी पश्चिम वॉर्ड क्र.६६ मध्ये वॉर्ड पदाधिकारी मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी झालो

      By admin | 0 comment

      भारतीय जनता पार्टी अंधेरी पश्चिम वॉर्ड क्र.६६ द्वारे आयोजित वॉर्ड पदाधिकारी नियुक्ती कार्यकर्ता मेळाव्यास प्रमुख अतिथी या नात्याने उपस्थित राहिलो. यावेळी सर्व नवनियुक्त वॉर्ड पदाधिकाऱ्यांचा माझ्या हस्ते सत्कार करण्यात आला.उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करतानाRead more

    • Conducted thorough site visits of all road works in Andheri West with BMC officials, contractors, and BJP workers

      By admin | 0 comment

      📍 Update on Ongoing Road Works in Andheri WestToday, I conducted extensive site visits across all ongoing road works in the entire Andheri West, accompanied by senior officials from the BMC, contractors executing the works,Read more

    Leave a Comment

    Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    NextPrevious

    Recent Posts

    • अंधेरी पश्चिमच्या वॉर्ड ६७-६८ मध्ये स्थानिक नागरिकांच्या ‘तिरंगा रॅली’त मोठ्या संख्येने सहभाग
    • अंधेरी पश्चिम मतदारसंघात आयोजित भव्यतिरंगा यात्रेमध्ये सहभागी झालो
    • जुहू बीच येथे नागरिकांसमवेत तिरंगा रॅलीत सहभागी झालो
    • अंधेरी पश्चिम वॉर्ड क्र.६६ मध्ये वॉर्ड पदाधिकारी मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी झालो
    • Conducted thorough site visits of all road works in Andheri West with BMC officials, contractors, and BJP workers
    • Conducted spot inspections of nalla cleaning work across key locations to ensure monsoon preparedness
    • गोखले पुलाचा दुसरा भाग अंधेरी पश्चिम येथे भाजप मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटित
    • माझ्या मूळगावी म्हाळुंगे-शेवरे येथे भवानीमातेच्या गोंधळ उत्सवात सहभागी होऊन पालखीचे स्वागत केले
    • वसंत स्मृती, दादर येथे भाजपा मुंबई कोअर कमिटीची बैठक अध्यक्ष मा. ॲड. आशिष शेलारजींच्या उपस्थितीत संपन्न झाली
    • Inspected Juhu Market Road sewer line site —100m pending, to be completed in 10–15 days

    Video

    Facebook

    Ameet Satam

    Twitter

    Tweets by @AmeetSatam

    Contact Info

    BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

    Email: ameetsatam@yahoo.com

    Powered By Trivoli Digital Private Limited
    • Home
    • Profile
    • Achievements
    • Portfolio
      • Gallery
      • Videos
    • Events
    • News
      • Latest News
      • Press Release
    • Contact Us
      • Contact Us
    Ameet Satam – MLA Andheri West