चेंबूर येथील नूतनीकरण केलेल्या जे. नवमल मैदानाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहिलो. तसेच गोवा येथे पार पडलेल्या Acrobiotics Gymnastics Asian Championships मध्ये ३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ५ कांस्य पदकांची कमाई करणाऱ्या श्री नारायण राव आचार्य विद्यानिकेतन येथील विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करून त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा सन्मान केला.
यावेळी कार्यक्रमास उपस्थित नागरिकांसोबत संवाद साधत भागातील विकासकामांची माहिती जाणून घेतली.
या प्रसंगी माझ्यासह आमदार श्री तुकाराम काते जी, माजी नगरसेवक श्री महादेव शिवगण जी व श्रीमती आशाताई मराठे, जिल्हाध्यक्ष श्री नीरज उभारे जी तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.














Leave a Comment