आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य मुंबई धारावी विधानसभा मतदारसंघाच्यावतीने आयोजित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपा पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित राहिलो.
या मेळाव्यात उपस्थित सर्व बूथ प्रमुख,शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यासाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन केले.
सदर बैठकीला माझ्यासह आमदार कॅप्टन तामिळ सेल्वन जी, भाजपा मुंबईचे महामंत्री श्री राजेश शिरवडकर जी, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री निरज उभारे जी, श्री विष्णू गायकवाड जी, श्री बाळा थेवर, श्री रमाकांत गुप्ता, श्री संदीप सिंह धाम, श्री जितू सोनवणे, युवा मोर्चा महामंत्री श्री दीपक सिंह तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि विकासाभिमुख मुंबईसाठी सर्वांनी एकजूट होऊन भाजपाची पताका अधिक बुलंद करण्याचा निर्धार केला.














Leave a Comment