आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर मुंबई भाजपा दहिसर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपा पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित राहिलो.
या मेळाव्यात उपस्थित सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यासाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी माझ्यासह आमदार श्रीमती मनीषाताई चौधरी, उत्तर मुंबई जिल्ह्याचे महामंत्री श्री बाबा सिंह जी, उत्तर मुंबई जिल्ह्याचे महामंत्री श्री अप्पा बेलवलकर जी, उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री दीपक तावडे जी, उत्तर मुंबई जिल्ह्याचे महामंत्री श्री. निखिल व्यास जी, उत्तर मुंबई जिल्ह्याच्या महामंत्री श्रीमती योगिताताई पाटील, दहिसर विधानसभा संयोजक श्री अरविंद यादव जी तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि विकासाभिमुख मुंबईसाठी सर्वांनी एकजूट होऊन भाजपाची पताका अधिक बुलंद करण्याचा निर्धार केला.















Leave a Comment