विवाह पंचमीच्या शुभमुहूर्तावर, राममंदिराचा अभिमान साजरा!”
अयोध्येतील रामलल्लाच्या मंदिराचे काम पूर्ण झाले असून, मंदिर पूर्णत्वाचा संदेश देणारा ध्वज फडकवण्याचा उत्सव आज मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष श्री मोहन भागवतजी यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्सवात पार पडला.
यावेळी, विवाह पंचमीच्या अभिजित मुहूर्तावर आदरणीय मोदीजी आणि आदरणीय मोहन भागवतजी यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार करण्यात आलेल्या स्वयंचलित यंत्राच्या माध्यमातून, सूर्याअंकित चिन्हांनी परिपूर्ण भगवा ध्वज अभिमानाने फडकवला.
या शुभमुहूर्तावर देशभरात एकता, श्रद्धा आणि हिंदवी स्वाभिमानाचा संदेश सर्वदूर पसरवण्यासाठी, सर्व नागरिकांनी आपापल्या कार्यालयीन ठिकाणी व घरांच्या छतावर भगवी पताका फडकावण्याचे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीसजी यांनी केले. त्यानुसार, आज कार्यालयाबाहेर हिंदुत्वाची शान असलेला भगवा ध्वज फडकवत राममंदिर पूर्णत्वाचा आनंद साजरा केला.
या मंगल प्रसंगी वातावरणात पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेचा वावर असल्याची अनुभूती अनुभवली.








Leave a Comment